पाचोरा – पाचोरा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात विविध ठिकाणी छापेमारी करून लाखोंचा मुद्देमाल व रोख रक्कम जमा करून कारवाई केली.
शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू असून पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या आदेशाने पाचोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी पोलिसांनी सापळे रचून कारवाई केली,गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याबरोबरच मध्यरात्री चोरीच्या प्रयत्नात असलेल्या अटल गुन्हेगारांना रंगेहात पकडून २ आरोपींना जेरबंद केले आहे. शहरात बिनधास्तपणे चालणारे अवैध व्यवसाय गुटखा, जुगार, सट्टा, पत्ता, दारू, गावठी हातभट्टी उध्वस्त करून दीड लाखाचा मुद्देमाल व रोख रक्कम जमा करून आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे. त्याच बरोबर मागील आठवड्यात शहरामधील वरखेडी नाका येथे चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी आणले असता आरोपीला मुद्देमाल सोबत ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे व पोलीस कर्मचारी अमृत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत पोलिसांनी मलकापूर येथील इसमाला शाईन गाडी सहित ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक सुरवाडे हे तपास करीत आहेत. पाचोरा पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पंकज शिंदे, पोलीस कर्मचारी प्रकाश पाटील, राहुल सोनवणे, राहुल बेहेरे, दीपक सुरवाडे, अमृत पाटील, किशोर पाटील, प्रशांत चौधरी, किरण पाटील, नरेंद्र नरवाडे आदी पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली आहे.