जळगाव । नॅशनल लॉ कमिशनने केंद्र सरकारला वकील व्यवसायासंदर्भात दुरुस्ती सुचविली असून तस अहवाल शासनाकडे देण्यात आला आहे. दुरुस्त्या सुचवून वकीली व्यवसाय करणार्यांवर अन्याय केला असल्याचे आरोप पाचोरा वकील संघातर्फे करण्यात आले असून संघातर्फे पाचोरा शहरात अॅडव्होकेट अॅक्ट दुरुस्ती विधेयक 2017 ची होळी करण्यात आली. विधेयकाचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. हे विधेयक मागे न घेतल्यास 2 में रोजी दिल्ली येथे वकील संघातर्फे मोर्चा काढण्यात आले आहे. तसेच वकील संर्घो जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.प्रविण पाटील, डी.आर.पाटील, मंगेश गायकवाड , एस.बी.माहेश्वरी, सुधाकर पाटील, जे.सी.राजपुत, एस.बी.मराठा, आर.के.येवले, ए.टी.सुर्यवंशी, व्हि.पी.पाटील, पी.बी.पाटील, त्रिशीला लोढे, राहुल पाटील, सचिन देशपांडे, आर.बी.परदेशी, बी.बी.पिंजारी, नाना महाजन, एस.पी.सिध्दू, अंकुश कंडारे, अविनाश सुतार, करुणाकर ब्राम्हणे, अनिल पाटील, संदीप पाटील, पी.आर.देशमुख, एस.एस.पठाण, डी.बी.लोहार, संजीव नैनाव, उपस्थित होते.