पाचोरा। पाचोरा शिवसेना आयोजित शेतकरी मेळावा सोमवार 12 रोजी दुपारी 3 वाजता राजीव गांधी टाऊन हॉल, शिवसेना कार्यालयासमोर आयोजित केला आहे.
या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक खा. संजय राऊत आहेत, मेळाव्याला प्रमुख उपस्थिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. किशोर पाटील, माजी आ. आर. ओ. तात्या पाटील, चिमणराव पाटील, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ, कैलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ‘मी कर्जमुक्त होणारच’ हा शेतकरी मेळावा आयोजित केल्या. यासाठी जिल्हाभरातील तालुका प्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, नगरसेवक सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे अशी विनंती पाचोरा-भडगाव शिवसेना-युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी केले आहे. तरी सर्वांनी उपस्थिती रहावे ही विनंती केली आहे.