पाचोर्‍यात उपगराध्यक्षपदी सेनेचे शरद पाटे

0

पाचोरा : पाचोरा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 26 पैकी 11 नगरसेवक असलेल्या शिवसेनेचे शरद पाटे यांनी भाजपाचे मनिष भोसले यांचा तीन मतांनी पराभव केला. पाचोरा शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 सदस्यांनी उपस्थित राहून ही मतदान प्रक्रियेत तटस्थ भूमिका घेतल्याने शरद पाटे यांना झालेल्या 19 पैकी 11 मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगराध्यक्ष संजय गोहील यांनी पाटे यांना विजयी घोषित केले. यावेळी सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी सभेचे कामकाज पाहिले. पाचोरा नगरपरीषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे संजय गोहील यांचेसह 27 नगरसेवक आहेत. यापैकी शिवसेना 11, राष्ट्रवादी काँग्रेस 07, जनाधार विकास आघाडी व भाजपा मिळून 08 असे संख्या बलाबल आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेेचे शरद रामकृष्ण पाटे व भाजपा पुरस्कृत आघाडीतर्फे मनिष शिवाजीराव भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक प्रक्रीयावर हात करून झाल्याने शरद पाटे यांना सुनित पाटील, महेश सोमवंशी, शरद पाटे, हजराबी तडवी, सतीष चेडे, हर्षाली जडे, संगिता पगारे, धर्मेंद्र चौधरी, राम केसवाणी, मालती हटकर, प्रियंका पाटील असे 11 मते भाजपाचे मनिष भोसले यांना विजया शिंदे, मनिषा भोसले, जनाधार विकास आघाडीचे अमोल शिंदे, सिंधूबाई शिंदे, सईदाबी खान, रफीक बागवान, अस्मिता भालेराव, विष्णू अहिरे असे 08 मते मिळाली. पाचोरा शहराचा विकास होण्याच्या नावाखाली आजी-माजी आमदारांनी गुप्त बैठका घेवून ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुचेता वाघ, संजय वाघ, अशोक मोरे, वासुदेव महाजन, रंजना भोसले, विकास पाटील, निलिमा पाटील यांनी सभेस उपस्थित राहून ही तटस्थ भूमिका घेतली. यामुळे अल्पमतात असूनही सेनेचे शरद पाटे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले.

स्वीकृत नगरसेवकांची निवड याप्रमाणे
पाचोरा पालिकेत उपनगराध्यक्ष पदासोबतच स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. शिवसेनेचे डॉ.भरत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड.दिपक पाटील, जनाधार विकास आघाडीचे अ‍ॅड.योगेश पाटील या तीन जणांची स्वीकृत सदस्यापदी निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक डॉ.भरत पाटील यांचे निवडीनंतर आ.किशोर पाटील, माजी आ.आर.ओ.पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, अ‍ॅड.दिनकर देवरे, अरुण पाटील यांनी पुष्पहार देऊन सत्कार केला. राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड.दीपक पाटील यांचा मा.आ.दिलीप वाघ, न.पा.गटनेते संजय वाघ, नगरसेवक विकास पाटील यांनी सत्कार केला तर जनाधार विकास आघाडीचे अ‍ॅड.योगेश पाटील यांचा अमोल शिंदे, मनिष भोसले, गिरज मुणोत यांनी सत्कार केला.