पाचोरा । शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये वर्ष 2017-18 मधील दल्लीत्तोतर वस्ती सुधार योजनेंतर्गत 1 कोटी निधींच्या विकास कामांचे भूमिपुजन आमदार किशारे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. प्रभाग 8 मधील आदर्श नगर, नारायण नगर, अरिहंत नगर, शांतीनंगर, मल्हारनगर, वृंदावन नगर यांच्यासह इतर कॉलनीतील रस्त्यांचे कॉक्रीटीकरणासाठी 1 कोई रुपयांचा निधी आमदार किशोर पाटील यांनी उपलब्ध करुन दिला आहे. वर्ष भरापासून परिसरातील नागरिकांचे वाहने येण्या-जाण्यासाठी अडचण होत होती. पावसाळ्यातील चिखलामुळे हाल होत होते.
या कामामुळे सर्व समस्या मिटणार आहे. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी किरण देशमुख मुकुंद बिल्दीकर, राम केसवाणी, दिपक राजपूत, उध्दव मराठे, शितल सोमवंशी, पप्पु राजपूत, किशोर बारवकर, अॅड.नैनाव, गजु पाटील, पिंटु राजपुत, अनिकेत सुर्यवंशी, अनिल पाटील, चिंतामण पाटील, अनिल बच्छाव, महेश पाटील, निलेश चौधरी, युवराज चौधरी, एसी पाटील आदी उपस्थित होते.