पाचोर्‍यात काँग्रेसचे रास्ता रोको

0

पाचोरा। पाचोरा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली जारगांव चौफुली येथे 11.30 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धरणगाव काँग्रेसचे डी. जी. पाटील, तालुकाध्यक्ष अभय पाटील, युवक काँग्रेसचे अविनाश भालेराव, जिल्हा आरोग्य सेलचे सचिन सोमवंशी, साहेबराव आबा पाटील, प्रताप पाटील, अनिल पाटील, मुक्तार शहा, विजय पाटील, सदाशिव पाटील, सोमनाथ मुळे, बालु श्रावणे, शरद पाटील, कैलास पाटील, दिपक गव्हाळे आदी उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनात सत्ताधारी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. रास्ता रोको आंदोलनात शिवसेनेच्या दुटप्पी भुमिकेबद्दल देखील घोषणा देण्यात आल्या.

रास्ता रोको आंदोलनात आंदोलकाची व शेतकर्‍यांची उपस्थिती अत्यंत नगण्य होती. दोन्ही बाजुला वाहतुक 15 ते 20 मिनिटे विस्कळीत झाली होती. वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. आंदोलकापेक्षा पोलिसांचा फाटा जास्त होता. उपविभागीय अधिकारी केशव पातोंड व पोलिस निरीक्षक श्री. भिरूळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला.