पाचोरा- धूम स्टाईल येत केळी व्यापार्याच्या हातातून एक लाख 44 हजारांची रोकड लांबवण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बसस्थानकाजवळील बागवान केला एजन्सीजवळ घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे.
पाळत ठेवून केली चोरी
बागवान केला एजन्सीचे मालक तथा माजी नगराध्यक्ष नशीर बागवान हे मॅनेजर सलीम शेख यांच्यासोबत सोमवारी दुपारी स्टेट बँकेत गेले होते. बँकेतून रोकड काढून दोन्ही जण बसस्थानकाजवळील एजन्सीजवळ वळत असताना पाळत ठेवून असलेल्या दुचाकीस्वारांनी धूम स्टाईल येत बागवान यांच्या हातातील रोकड लांबवली. या प्रकारात बागवान यांची दुचाकी स्लीप होवून ते जखमी झाले तर चोरटे तारखेडा रस्त्याने धूम स्टाईल पसार झाले. पाचोरा पोलिसांना माहिती कळवल्यानंतर दुचाकीस्वारांचा शोध घेण्यात आला मात्र यश आले नाही. काळ्या रंगाच्या दुचाकीवरील एकाने लाल शर्ट घातला असल्याचे सांगण्यात आले.