काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच प्रतिपादन
पाचोरा । गरीबांना अत्यंत अल्प दरात उपचार व्हावा म्हणून समाजात सेवाभावी संस्था पुढे याव्यात असे आवाहन कॉग्रेस आयचे आरोग्य सेवा सेलचे जिल्हा अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी येथील साई सेवा पॉलिक्लिनीक आणि डेकेअर सेंटरच्या उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरविंद पवार, डॉ. नामदेव जाधव, डॉ. मनिष अग्रवाल, आरोग्य सेवा सेलचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अनिरुद्ध सावळे, तालुकाध्यक्ष डॉ. फिरोज शेख, विश्वास पवार, अजित पवार, राहुल शिंदे, शामराव पवार, जुगल अग्रवाल, चरणदास पवार आदी उपस्थित होते. पाचोरा बायपास रोड वरील भास्कर नगर बसस्थानक जवळ विकास कॉलनी परीसरात हे सुसज्ज साई सेवा पॉलिक्लिनीक सुरू झाले आहे.
पाचोरा-भडगावसह तालुक्यातील लगत च्या इतर गांवाना गरीबांना केवळ 20 रुपयात रुग्णसेवा नुकतीच विकास कॉलनी परीसरात साई सेवा पॉलिक्लिनीक आणि डेकेअर सेंटर च्या माध्यमातून सुरू झाली आहे. याचे उद्घाटन आरोग्य सेवा सेलचे अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी बोलताना श्री सोमवंशी पुढे म्हणाले की, आरोग्य सेवा ही धनिकांच्या नशिबी असते. परंतु समाजात 70 टक्के हुन अधिक लोक मध्यवर्गीय जीवन जगत आहेत. त्यामुळे उपचारा अभावामुळे अनेकांना मृत्यूच्या दारात जावे लागते. तर लहान उपचारासाठी देखील पैसे नसल्याने रुग्णाच्या आजारात वाढ होत असते. अशा वेळी सामाजिक संस्था च्या माध्यमातून डॉ. अरविंद पवार सारखे व्यक्तीमत्व पुढे येऊन गरीब गरजु रुग्णांची सेवाचा विडा उचलतात हे महान कार्य आहे. साई सेवा पॉलिक्लिनीक आणि डेकेअर सेंटर च्या माध्यमातून पाचोरा शहरातील आणि परिसरातील रुग्णांची सेवा होणार असून सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेवटी केले.