पाचोरा । महाराष्ट्र शासनाने एक महीन्यापूर्वी तूर खरेदी केंद्र बंद केले होते. परंतु शेतकर्यांच्या मागणीनुसार 22 पासून शासकीय तूर खरेदी वखार महामंडळाच्या गोडावून मध्ये सुरु झाली असून. शेतकर्यांनी तूर आणण्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपले नावे नोंदवावीत नावे नोंदणी करतांना सात-बारा उतार्यावर तूर लावलेली असावी आधार कार्डची झेरॉक्स, बँकेचे पासबुक इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. कारण महाराष्ट्र शासनाने तसे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी सर्व कागदपत्राची खात्री करुन त्या शेतकर्यांना टोकण देण्यात येईल. अशी माहिती मार्केट कमिटीचे सचिव बोरुडे यांनी दिली. त्यानंतर शेतकरी संघाच्या आदेशाने वखार महामंडळाच्या गोडावून मध्ये तूर मोजली जाईल. त्या ठिकाणी भगवान पाटील शेतकरी संघ पाचोरा हे मोजमापाचे कामकाज पाहतील