पाचोर्‍यात नगरभूमापन कार्यालयाला कुलूप

0

पाचोरा । उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात जनतेची कामे होत नसल्याने वैतागलेल्या नागरिकांसह शिवसैनिकानी शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आंदोलन करीत भूमी अभिलेख कार्यालयाला कुलूप ठोकले. नगरभूमान कार्यलयात जनतेची कामे होत नाहीत. कामे बर्‍याच महिन्यांपासून खोळंबली आहेत. रखरखीत उन्हामुळे फेर्‍या मारून नागरिक पार वैतागलेले आहे. मात्र नागरिकांचे समाधान होत नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारवकर यांचे नेतृतवाखाली शिवसैनिक जाब विचारण्यासाठी 21 रोजी दुपारी कार्यालयात धडकले. उपअधीक्षक सुषमा पवार कार्यालयात उपस्थित नव्हत्या.

मुख्यलिपीक देखील उपस्थित नसल्याने संताप व्यक्त करून नागरिकांसह शिवसैनिकांनी उपअधीक्षकांच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी पाचोरा शहर प्रमुख किशोर बारावकर, गंगाराम पाटील, युवासेनेचे जितेंद्र पेंढारकर, शेख जावेद, अरुण ओझा आदि उपस्थित होते.