पाचोरा :- पॉलिशच्या बहाण्याने चोरट्यांनी हात की सफाई दाखवत सुमारे साडेचार लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी शहरातील देशमुखवाडी भागात घडली. 30 ते 35 वयोगटातील दोन अनोळखी युवकांनी उजाला कंपनीच्या पावडरने आम्ही दोन मिनिटात दागिने चमकावून देतो, असे सांगत वंदना शरदचंद्र काबरा (67) या वयोवृद्धेकडील सुमारे साडेचार लाखांचे दागिने अवघ्या पाच मिनिटात लांबवून पोबारा केला.