पिता-पूत्रांना अटक ; मारहाण झाल्याने तरुणाने सोडले प्राण
पाचोरा:– शहरातील किशोर मोरे (23) या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी शहरातील पिता-पूत्र अटक करण्यात आली आहे. मालमत्तेच्या वादातून किशोर मोरे या तरुणास आरोपी पिता-पूत्रांनी मारहाण करीत त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकला. मंगळवारी या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर सुलोचना मोरे यांच्या तक्रारीनुसार पाचोरा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयीत आरोपी सोमनाथ मोरे व त्यांचा मुलगा सिद्धेश्वर सोमनाथ मोरे यांना ताब्यात घेण्यात आले. खुनानंतर उपअधीक्षक केशव पातोंड यांनी भेट दिली. तपास पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी करीत आहेत.