पाचोर्‍यात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

0

पाचोरा – शासनाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे गुरुवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कार्यालय ते तहसील कार्यालयदरम्यान पायी मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या निषेधार्थ लोकप्रतिनिधींनी मनोगतातून टिकेची राळ उठवली. नायब तहसीलदार उमाकांत तडवी यांना निवेदन देण्यात आले. माजी आमदार दिलीप वाघ, पीटीसी चेअरमन संजय वाघ, तालुकाध्यक्ष शालिग्राम मालकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय वाघ, नितीन तावडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.