पाचोरा- लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध प्रस्थापीत करीत विवाहितेला पतीपासून घटस्फोट घेण्यास प्रवृत्त केल्याप्रकणी शहरातील स्टँम्प वेंडर रवींद्र ब्राह्मणेसह चौघांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी ब्राह्मणे यास अटक करण्यात आली.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार रवींद्र ब्राह्मणे याच्या घरी येणे-जाणे असल्याने ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. संशयीताने लग्नाचे आमिष देत शारीरीक संबंध ठेवले. रवींद्रच्या सांगण्यामुळे मी माझा साखरपुडा मोडला तर रवींद्रच्या दोघा मोठ्या भावांचे विवाह बाकी असल्याने विवाह करणे शक्य नव्हते तर पीडीतेचे वय वाढत असल्याने रवींद्रने आपल्याला लग्न करून घे, असे सांगत आपल्या भावांचे लग्न झाल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करेल, असे आमिष दिले. शिवाय आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत पीडीतेने पतीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर आरोपी रवींद्रने लग्न करण्यास टाळाटाळ केली. या गुन्ह्यात रवींद्रसह शांताबाई ब्राह्मणे, विजय ब्राह्मणे, अरुण ब्राह्मणे यांचाही सहभाग असल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले. तपास चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक इंगळे, सहाय्यक निरीक्षक सचिन सानप करीत आहेत.