पाचोर्‍यात शिवसेनेतर्फे ‘मी कर्जमुक्त होणारच’ उपक्रम

0

पाचोरा । शिवसेनेचा वर्धापन दिवस 19 जून रोजी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. 19 मे रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्र स्तरीय कृषी मेळावा नाशिक येथे आयोजित केला होता. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मी कर्जमुक्त होणारच अशा पद्धतीची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केला. त्यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात तमाम शिवसैनिकांना आवाहन करून शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तालुक्या प्रत्येक शेतकर्‍यापर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून ‘मी कर्जमुक्त होणारच’ हे फॉर्म भरून घेण्याचे आदेश दिले.

1 जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडून फॉर्म भरून ते फॉर्म 1 जुलै रोजी शिवसेना भवन मुंबई येथे जमा करण्याचे आदेश सर्व शिवसैनिकांना दिले. त्याची सुरूवात पाचोरा-भडगाव या विधानसभा मतदार संघापासून करण्यात आले त्यावेळेस शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 लाख फॉर्म दोन्ही तालुक्यात 2 जून पासून सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे वाटप झालेले असून उद्यापासून शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी गावा-गावात जाऊन शेतकर्‍यांकडून फॉर्म भरून आणण्याची सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. या विषयासंदर्भात पाचोरा-भडगाव मतदारसंघात शेतकर्‍यांना भेटून माजी आमदार आर.ओ. तात्या पाटील, आमदार किशोर पाटील, भडगाव पंचायत समितीचे सभापती विकास पाटील सर्व जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक व सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी मी कर्जमुक्त होणारच याविषयी मार्गदर्शन करणार आहे.

याच बैठकीत महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर गेल्याची घटना आज घडली. या विषयावर चर्चा करतांना शासनाने या विषयाची गांभीर्याने लक्ष देऊन याची हिणगी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांमध्ये पडणार आहे. याची दक्षता घेऊन शेतकर्‍यांची मागणी पूर्ण करावी. शेतकर्‍यांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये. तसेच शेतकर्‍यांच्या या विषयांवर मार्ग निघणार नसेल तर शिवसेना आंदोलनात रस्त्यावर शेतकर्‍यांसोबत उतरणार अशी माहिती या आ. किशोर पाटभल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळेस आ. किशोर पाटील, दिपक राजपूत, उद्धव मराठे, गणेश पाटील, युवराज पाटील, अंबादास सोमवंशी तसेच असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.