पाचोरा शहरात सोमवारपासून सात दिवस जनता कर्फ्यू

0

पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा शहरात कोरोनाचा शिरकाव झालेल्या करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न पाचोरा कोरोना बाधितांची संख्या १५ झाली आहे. यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. दरम्यान 11 तारखेपासून 17 पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय सर्व पक्षांनी घेतला आहे.

शहरातील रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ़ होत आहे. शहरात नागरिकांचा मुक्तपणे सुरू असलेला संचार व शासनाचे नियंम धाब्यावर ठेऊन आपले उद्योग सुरू ठेवणाच्यावर प्रशासन किती करडी नजर ठेवणार? सध्या शहरवासीयांच्या वागण्यापुढे प्रशासन हतबल झाले आहे.मात्र रूग्ण वाढल्याने प्रशासन पुन्हा कामाला लागले आहे. शहरांत सुरूवातिला बागवान गल्ली,सिंधी कॉलनी व भीमनगर या भागात सुरू झालेल्या कोरोनाने शहरात आपले जाळे विणायला सूरूवात केली आहे. या भागातिल. तिन रूग्णांच्या संपर्कातील घरातिल व परिसरातिल व्यक्तिना प्रशासनाने कॉरंटाईन करून शहरात काही दिवस कडकडीत बंद ठेवला होता. यातील काहींचे रिपोर्ट निगेटिव्ह तर घरच्याच सदस्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आज मात्र पुन्हा आंबेडकर नगर येथील तरुण, गिरड रोड येथील पुरुष २० वर्षीय तरूणीचा अहवाल पॉझिटिव्ह आज नगरपालिका प्रशासनातिल मृत व्यक्तिच्यां घरातील २० वर्षिय तरूणीचा वैद्यकिय अहवाल हा पॉझिटिव्ह आला असुन याच व्यक्तिच्या संपर्कातिल शिवकॉलनी भागाजवळिल एका कर्मचायांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.या दोन्ही व्यक्तिना पुर्विच प्रशासनाने क्वारंटाईन केले होते. त्यात आज शहरातील माहीजी नाका परिसरातिल एका नवीन रूग्णाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा प्रशासनाच्या कामात भर पडुन शहराच्या आरोग्याची काळजी वाढली आहे. माहीजी नाका या भागातील नवीन रूग्णामुळे या भागासह शिवकॉलनी परिसर प्रशासनाने सिल. करून तेथे फवारणी करणार असुन माहीजी नाका,परधाडे रोडवर मच्छिबजार,आठवडे बाजार पंचमुखी हनुमान चौक या भागातील नागरिकांच्या भितीत भर पडली आहे. व अंतुली येथीलं एकास कोरोनाची झाल्याने ही संख्या आता १५ वर आहे महत्वाचे लोकांचे रिपोट धक्कादायक येतात की काय असा धाक होता मात्र त्याचा रिपोट निगेटिव्ह आल्याने धोका दूर झाला आहे .पाचोऱ्यात रात्रंदिवस पोलीस अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत असून त्याचे आरोग धोक्यात येऊन नये म्हणून विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ भूषण मंगर यांनी सर्व पोलिसांची आरोग तपासणी सुरू केली आहे पाचोऱ्यात २४ तास रुग्णालयात राहून रुग्णाची वेळोवेळी काळजी घेत असून डॉ भूषण मगर व डॉ सागर गरुड व विघ्नहर्ता सर्व टीमचे आभार मानले जात आहे कोरणाची संख्या वाढू नये म्हणून प्रत्येकाने घरात बसा बाहेर गप्प मारत बसू नका नियमाचे पालन करा असे आव्हान आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ डॉ अमित साळूखे डॉ भूषण मगर यांनी केले आहे.