पाचोरा। शहरातील गुरूदत्त कॉलनी भागात देशी विदेशी दारुची गुप्त विक्री सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवारी 15 रोजी सापळा रचुन आरोपींना मद्यासह रंगेहात पकडण्यात आले. पोलीसांनी या कारवाईत 50 हजार किमतीचे देशी विदेशी दारु जप्त केली आहे. पोलिस प्रशासनाने केलेली ही कारवाही मुळे शहरात चोरट्या पध्दतीने सुरू असलेल्या दारु विक्रेत्यांचे धाबे दणादले आहे.
गुरुदत्त कॉलनी येथे सुरु होती गुप्त विक्री
शहरात राज्य महामार्गाच्या आदेशामूळे अनेक दारू दुकाने व बिअर बार बंद पडल्याने तळीरामांची तहाण भागविण्यासाठी कानाकोपर्यात दारु विक्री सुरु आहे. गुरुदत्त कॉलनी भागात संशहीत आरोपी बापु अर्जुन महाजन यांच्या घरात देशी व विदेशी दारुची विक्री सुरु असल्याची खबर पाचोरा पोलिसांना मिळाली. उपविभागिय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक धनंजय वेरुळे यांच्या पथकाने सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, राहुल सोनवणे, प्रकाश पाटील, किरण पाटील, राहुल बेहरे व गजानन काळे यांचे पथकाने सापळा रचला. यात 49 हजार 531 रुपयांची देशी व विदेशी दारु आढळुन आली. सदर मुद्देमाल पंचनामा करुन पथकाने जप्त केली. आरोपी बापु अर्जुन महाजन यांच्या विरूध्द पोलिस नाईक राहुल सोनवणे यांनी मुंबई दारुबंदी कायदा अन्वेय गुन्हा दाखल केला आहे. शहरातआशा स्वरूपाची बेकायदा दारु विक्री करणारा कोणी आढळुन आल्यास पाचोरा पोलिसांशी संपर्क करावा असे अवाहन पोलिस निरीक्षक धनंजय वेरूळे यांनी केले आहे.