पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोऱ्यात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच एका संशयित शासकीय कर्मचाऱ्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने प्रशासनाने शहरात हायअलर्ट जारी केला असून सर्वत्र नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे.
शहरातील स्टेट बँक परिसरासह काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. सदर बाधित मयत व्यक्ती हा उपचारासाठी शहरातील काही दवाखान्यात फिरल्याने तेथील डॉक्टरांना कोरोनटाईन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत तसेच मयत व्यक्ती हा संपर्कात आलेल्या कुटुंबातील 17 व्यक्तींना जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून उर्वरित सुमारे 15 जणांना पाचोऱ्यातच आयसोलेशन कक्षात भरती करण्यात आले आहे. काहीं संशयीताचे नमुने तपासणी साठी पाठवले आहेत.त्यांच्या संपर्कातील इतर नागरिकांचा शोध सुरू असून बहुतांश लोकांनी स्वतः आयसोलेट होणे पसंद केले आहे.हा पॉझिटिव्ह अहवाल सकाळी सात वाजेच्या सुमारास आल्यास गेल्या 23 एप्रिल रोजी पाचोरा परिसरातील सकाळी बँकेच्या कामासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती दहा वाजता प्रांताधिकारी राजेंद्र कचरे उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे पालिकेचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर तहसीलदार कैलास चावाडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समाधान वाघ डॉक्टर अमित साळुंखे यांनी भागाची पाहणी करत आवश्यक उपाय योजना केल्या यावेळी डॉक्टर सुनील गवळी यांच्यासह न पा प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले तसेच आरोग्य अधिकारी ठाकूर ,विकास पाटील, राजू गायकवाड यांनी सदर मयत व्यक्तीच्या कुटुंबाच्या सखोल माहिती घेत परिसरात फवारणी केली.
पोलिसांनी देखील अनावश्यक बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना सक्त सूचना दिल्या तर शहरातील विग्नहर्ता हॉस्पिटल हे डॉ भूषण मगर यांनी स्वेच्छेने प्रशासनास अधिग्रहीत करून दिले असून येथे आयोसोलेशन केलेल्या रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत पालिकेने देखील किराणा , भाजीपाला व फळे विक्रेते यांची यादी जाहीर केली असून नागरिकांनी घरूनच विक्रेत्यांना फोन वर यादी सांगून माल घरपोच मागावण्याची सूचना केली आहे.