पाचोरा । स्टेशन रोड शिवाजी चौकात असलेल्या एका वेल्डिंगच्या दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने किरकोळ आग लागल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. मात्र तरूणांच्या प्रसंगावधाने ही आग आटोक्यात आणली होती. स्टेशन रोड शिवाजी चौकात भाग्यलक्ष्मी हॉटेल समोर असलेल्या वेल्डींगच्या दुकानास 21 रोजी सायंकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याचे तरूणांच्या लक्षात आल्याने ही आग त्वरीत विझविण्यात आली. यात मात्र कोणतीही जिवितहानी झाली नाही.