जळगाव। पाच एकर शेती असलेल्या शेतकर्यांना खरीप हंमागासाठी मोफत खते व बियाणे देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचीही माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे खरीप आढावा बैठकीत दिली. अडचणीतील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन कजर्माफीबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांना आज ना उद्या कजर्माफी मिळेल. कजर्माफी कशी द्यायची याचा अभ्यास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. शेती फायद्याचह व्हावहयासाठी खते, बियाणे, किटकनाकांच्या किंमती कमी करणे आदी निर्णय घेऊन उत्पादन खर्च कमी कसा करता येईल, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आ.स्मिताताई वाघ, आ. एकनाथराव खडसे, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील , विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे उपस्थित होते.
‘जलयुक्त जळगाव’चे प्रकाशन : ‘जलयुक्त जळगाव’ या जलयुक्त शिवार अभियान फलश्रृतीवर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन व कापूस गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन आणि नाविन्यता परिषदेच्या पोर्टलचे अनावरणही ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंत पंचायत राज अभियानात जळगाव जिल्हा परिषदेला राज्यात तिसर्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्ज्वला पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व विभागप्रमुखांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी सादर केले. त्यानुसार, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 8 लक्ष 42 हजार 599 हेक्टर इतके पेरणीचे क्षेत्र असून असून त्यापैकी 7 लक्ष 80 हजार हेक्टर क्षेत्र पेरणीचा लक्षांक ठरविण्यात आला आहे. रब्बी हंगामासाठी 1 लाख 82 हजार 45 क्षेत्र असून प्रत्यक्षात 2 लाख 11 हजार 900 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा लक्षांक ठरविण्यात आला आहे.
पाणी टंचाई आढावा : जिल्ह्यात सर्व मोठ्या प्रकल्पात 24.59 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यासाठी 579 उपाययोजना राबविण्यासाठी 7 कोटी 35 लक्ष 5 हजार रुपयांचा संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यात आलाआहे. 13 गावांमध्ये 6 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मनरेगोअंतर्गत जिल्ह्यात 25.56 लक्ष मनुष्यदिवस कामाच्या निर्मितीचे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले होते. त्यापैकी 98 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे.1591 कामे सुरु असून त्यात वैयक्तिक सिंचन विहिरी, वैयक्तिक शौचालय, आवास योजनेतील घरकूल, फळबाग लागवड, रोपवाटिका निर्मिती, गाव तलाव, पारंपारिक जलसाठ्यांचे नुतनीकरण, जलसंधारण उपचारांचीही कामे केली जात आहेत. ना. पाटील म्हणाले की, पाण्याची टंचाई भासणार्या गावांसाठी टँकरने पाणीपुरवठ्याचा अधिकार तहसिलदार पातळीवर देऊन कमीत कमी वेळात शहानिशा करुन तात्काळ टँकरने पाणीपुरवठा कसा सुरु होईल, या दृष्टीने नियोजन करावेे. सार्वजनिक वितरण प्रणालीचे सर्वत्र आधार संलग्निकरण , बायोमेट्रिक पद्धतीने वितरणामुळे गैरप्रकारांना आळा बसला आहे.
मराठा आंदोलकांच्या भुमिकेचे स्वागत मराठा समाजाला देण्यासंदर्भात शासन गंभीर आहे. आंदोलन करणार्या संघटनांची नुकतीच कोल्हापूर येथे ागोलमेज परिषद झाली. या बैठकीत या संघटनांनी आरक्षणाच्या मुद्यावर शासनाशी चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. या भुमिकेचे शासनाच्या वतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे.यामुळे मराठा आरक्षण या मुद्यावर शासनाची न्यायालयीन लढाई सुकर होईल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणासाठी शासनाला आवश्यक पुरावे या आंदोलकांकडून मिळतील, अशी अपेक्षा आहे. गौण खनिजाच्या अवैध वाहतूक आणि तस्करीबाबत मुलभूत धोरणात बदल करणे अपेक्षित आहे. आंध्रप्रदेश, दीव दमणासारख्या भागातील वाळू उपसा धोरणांचा अभ्यास करण्यात येत आहे. दोन सेवानिवृत्त अधिकार्यांची समितीही नियुक्त करण्यात आली आहे. जळगाव येथील महामार्गाच्या डागडुजीचे काम मे अखेर सुरु होईल. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सप्टेंबर महिन्यापासून सुरु होईल, असेही त्यांनी सांगितले.