जळगाव- नशिराबाद येथील एकाला स्टेट बँकेचा मॅनेजर म्हणून बोलत असल्याचे भासवून एटीएमचा नंबर, पिन मिळवून 36 हजार 200 रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांच्या पथकाने दुसर्या क्रमाकांच्या डबलुकुमारसिंह उर्फ राजकुमारसिंह बबलुसिंह वय 26 रा. निरसा, पोस्ट निरसा, चट्टी जि.धनबाद, झारखंड येथून अटक केली आहे. दरम्यान अटकेतील शर्मा ने त्याचे खाते बबलुसिंह यास पाच टक्के कमिशनवर वापरण्यास दिले होते. पाच टक्के कमिशनच्या आमिषाने शर्मा फसला अन् त्याच्यावर पोलीस कोठडीची वेळ आल्याची माहिती मिळाली आहे.
नशिराबाद येथील मोहन अशोक बर्हाटे यांची 36 हजार 200 रुपयांत फसवणुक प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात पोलिसांनी 16 रोजी रमेश शिवशरण शर्मा रा. विद्यासागर कॉलनी, निरसा, धनबाद, झारखंड, ह.मु.केरळ यास अटक केली होती. तो 25 पर्यंत पोलीस कोठडीत आहे.
पाच टक्के कमिशन मिळण्यापूर्वीच अटक
अटकेतील रमेश शर्मा व डबलुकुमारसिंह हे एकाच गावातील तसेच एका परिसरात राहणारे आहेत. डबलुकुमारसिंहची चहाची टपरी आहे. त्याने शर्मा याला मी फसवणूक केलेली रक्कम तुझ्यावर टाकेल. तुझ्या खाते मला वापरण्यासाठी दे. एकूण रकमेच्या तुला पाच टक्के कमिशन देईल असे शर्माला सांगितले होते. त्यानुसार शर्माने त्याचे खाते व एटीएमकार्ड डबलुकुमारसिंहयाला दिले. डबलुकुमारसिंह सदर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम शर्माच्याच खात्यावर टाकली होती. व एटीएममधून काढली होती. पोलिसांनी धनाबाद येथील एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज, आयपी अॅड्रेस, मोबाईल लोकेशनवरुन डबलुकुमारसिंहला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 25 पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान शर्माला अद्यापर्यंत पाच टक्के कमिशन मिळाले नसून ते मिळण्यापूर्वी पोलिसांनी गुन्ह्यात अटक केल्याची माहिती मिळाली आहे.