पाच ट्रक जलपर्णी गोळा

0

पिंपरी : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी सुरु केलेल्या पवना नदी स्वच्छतेच्या ’उगम ते संगम’ या उपक्रमाचे व इतर संस्थांचे कौतुक केले. तसेच उपक्रमाला 11 हजार रुपयांची देणगी खासदार अमर साबळे यांनी दिली. उपक्रमासाठी रोटरी क्लबच्या वतीने ठेवलेल्या देणगी कलशामध्ये एकूण 51 हजार 120 रुपयांची रक्कम जमा झाली. अभियानाचा हा तिसरा आठवडा आहे. यामध्ये रोज 35 ते 40 मजूर अभियानात काम करत असताना प्रत्येक रविवारी विविध एन. जी. ओ. व निसर्ग प्रेमी आणि लोक सहभागातून हे अभियान जोराने पुढे जात आहे. रोटरीचे सर्व सदस्य, वाल्हेकरवाडी ग्रामस्थ आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व निसर्ग प्रेमी व रानजाई प्रकल्पातील मजूर यांनी आज पाच ट्रक जलपर्णी नदीबाहेर काढून हे अभियान पूर्णत्वास नेले.