पाच दिवस आधार केंद्र बंद

0

पुणे । विविध खात्यांसाठी आधारकार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने दि. 31 मार्चपर्यर्ंत मुदतवाढ आहे. त्यामुळे सध्या नविन आधारकार्ड काढणे तसेच आधारकार्डात दुरूस्ती करण्यासाठी नागरीकांची आधार नोंदणी केंद्रावर गर्दी वाढली आहे. मात्र सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे किमान पाच दिवस आधार नोंदणी व दुरूस्ती बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अडचणीमंळे नागरीक हैराण
गेल्या काही दिवसांपासुन सर्व्हरमध गेल्या काही दिवसांपासून आधार नोंदणी यंत्रणेत तांत्रिक बिघाड होत असून, जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात देशभरातील आधार नोंदणी यंत्रणा कोलमडली होती. त्यात दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पुन्हा सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, किमान पुढील पाच दिवस नोंदणी ठप्प असणार आहे.त्यामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत असुन वारंवार आधार नोंदणीसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत.

राज्यभरात सर्वत्र समस्या
केंद्र व राज्य शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक असणे बंधनकारक केले. आधार नोंदणी केंद्रातील मशीनवर नोंदणी झाल्यावर त्यामधील डेटा हा आधारच्या मुख्य सर्व्हरला पाठविण्यात येतो. सेक्युअर्ड फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने आधार मशिनमधील डेटा हा मुख्य सर्व्हरमध्ये पाठविला जाण्यास अडचणी येत होत्या. जर पाच दिवस मशिनमधील डेटा सर्व्हरमध्ये अपलोड झाला नाही, तर आपोआप मशिन बंद पडतात. ही समस्या राज्यात सर्वत्र जाणवत आहे.

आधार नोंदणीचे 92 टक्के काम पूर्ण
आधार नोंदणी करण्याचे काम जवळपास 92 टक्के पूर्ण झाले आहे. परंतु, त्यात झालेल्या चुका दुरुस्ती करण्यासाठी केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे, अशातच देशातील आधारच्या मुख्य सर्व्हरमधील सेक्युअर्ड फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलमध्ये (एसएफटीपी) तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यभरातील आधार नोंदणीची यंत्रणा ठप्प झाली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून आधार नोंदणी व दुरुस्तीचे काम बंद आहे.

बुधवारी सेवा सुरू होण्याची शक्यता
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील केंद्रांवर आधार नोंदणी आणि दुरुस्ती संथगतीने सुरू होते. मात्र शनिवारपासून पुण्यासह राज्यभरात आधार नोंदणी आणि दुरुस्ती सेवा पूर्णत: बंद पडली. आधार नोंदणी अथवा दुरुस्ती बुधवारी सुरू होण्याची शक्यता आहे. जर तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यास लवकर सुरू होईल, असा विश्‍वास आधारचे नोडल अधिकारी तथा तहसीलदार विकास भालेराव यांनी व्यक्त केला आहे.