पाच लाखांचा मका आगीत खाक : चिंचखेडा गावातील घटना

चाळीसगाव : शेती पिकांना आगी लागल्याच्या घटना घडत असताना चाळीसगाव तालुक्यातील चिंचखेडा येेथेदेखील अशीच घटना समोर आली आहे. शेतात शॉर्टसर्किट झाल्यामुळे चार एकरातील मका जळून खाक झाल्याने शेतकर्‍याचे पाच लाखांचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजच्या घडली.

शॉर्टसर्किटने आग
चाळीसगाव तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतकरी कन्हैय्यालाल मुरलिधर पाटील यांच्या दडपिंप्री रस्त्यालगत असलेल्या शेतातील डीपीत शनिवारी दुपारी तीन वाजता अचानक बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाल्याने शेतातील चार एकर मका जळून खाक झाला. पाटील यांनी गेल्या चार महिन्यांपूर्वीच शेतात दोन-अडीच लाखाचा ठिबक बसविला होता त्यामुळे ठिबकासह एकूण पाच लाखांचे नुकसान झाले आहे.