पुणे । पीएमपीएमएलने वाघोली ते हडपसर या दरम्यान प्रवास करणार्या एका महिलेचे 5 लाख 12 हजाराचे दागिने अज्ञात इसमाने लंपास केले.
जयश्री शेडगे (वय 68, रा. सासवड) या बसने प्रवास करत होत्या. मुंढवा ब्रिज ते अमनोरा टाऊन मगरपट्टा दरम्यान अज्ञाताने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या जवळील पिशवीची चैन उघडून सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.