पाच लाखांसाठी बोदवडच्या विवाहितेचा छळ : पतीसह सात जणांविरोधात गुन्हा

बोदवड : माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने बोदवड येथील माहेर व मध्यप्रदेशातील इंदोरमधील सासर असेल्या विवाहितेचा छळ करून मारहाण करण्यात आली. छळ असह्य झाल्याने विवाहितेने बोदवड पोलिसात तक्रार दिल्यानंतर पतीसह सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सात आरोपींविरोधात गुन्हा
प्रियंका मनीषकुमार इंगळे (27, ह.मु.रेणुकानगर, बोदवड) या विवाहितेच्या तक्रारीनुसार पती मनिषकुमार निळकंठ इंगळे, सासरे निळकंठ देवराम इंगळे, सासू मायाबाई निळकंठ इंगळे, दीर आशिष निळकंठ इंगळे, नणंद मनिषा आशुतोष कांबळे, चुलत सासरे विनोद देवराम इंगळे, चुलत दीर अंकीत विनोद इंगळे (सर्व राहणार इंदौर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पती मनीषकुमार निळकंठ इंगळे यांच्याशी विवाह झाल्यानंतर पतीसह सासरच्यांनी वेळोवेळी पाच लाख रुपये आणण्याची मागणी करून ती पूर्ण न केल्याने शारीरीक, मानसिक छळ करून मारहाण केली तसेच घराबाहेर हाकलून दिले. सासरी इंदोर व बोदवड येथे फिर्यादीच्या माहेरी छळ करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुधाकर शेजोळे करीत आहेत.