पतीसह पाचजणांविरोधात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव । शहरातील रायसोनी नगरात एका 26 वर्षीय विवाहितेची सासरच्या मंडळींकडून पैश्यांकरिता मारहाण, शारिरीक व मानसिक छळ करत 5 लाख रूपये माहेरहून आणावे असा तगादा लावल्याने विवाहितेने रामानंद पोलिसात पतीसह इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिडीत विवाहिता (वय-26) रा. मनियार खेडा ता.जि.जळगाव येथील रहिवासी असून पती सचिन मधुकर पाटील यांनी लग्नापासून या ना त्या कारणावरून मारहाण, शिवीगाळ व दामदाटी करून माहेरहून 5 लाख रूपये आणण्यास सांगितले. त्याला विरोध केल्याने आरोपीसह सासू मंगलाबाई मधुकार पाटील, सासरे मधुकर गणा पाटील, दिर नितीन मधुकर पाटील, ननंद सुनैयना रोनक पाटील, नंदोयी रोनक प्रदीप पाटील यांनी छळ करण्यास सुरूवात केली. त्यांनी केलेल्या वेळोवेळी मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ सहन न झाल्याने विवाहितेने थेट रामानंद पोलिसात धाव घेतली. पिडीत विवाहिता यांच्या फिर्यादीवरून पतीसह इतर पाच जणांविरोधात भादवी कलम 498,354,323,504, 506, 34 प्रमाणे रामानंद पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ.अरूण निकुंभ हे करित आहे.