पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ ; पतीसह सासूविरोधात गुन्हा

जळगाव : माहेरहून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शहरातील शनीपेठ परीसरातील योगेश्वर नगरात राहणार्‍या विवाहितेचा पती व सासू यांच्याकडून छळ करण्यात आला. या प्रकरणी बुधवार, 15 डिसेंबर रोजी सायंकाळी शनीपेठ पोलिस ठाण्यात पतीसह सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शनीपेठ पोलिसात गुन्हा
शनीपेठ परीसरातील योगेश्वर नगरातील विवाहिता पल्लवी प्रदीप चौधरी (34) यांचा विवाह रावेर तालुक्यातील रोझोदा येथील प्रदीप घनश्याम चौधरी यांच्याशी 2009 मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर पती प्रदीप चौधरी याने विवाहितेला लहान-लहान गोष्टीवरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला शिविगाळ करून मारहाण करण्यात आली. सासू मंगलाबाई यांनीदेखील पाच लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. या छळाला कंटाळून विवाहिता बुधवार, 15 डिसेंबर रेाजी माहेरी निघून आल्या व त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून पती प्रदीप घनश्याम चौधरी आणि सासू मंगलाबाई घनश्याम चौधरी यांच्याविरोधात शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस नाईक अर्चना भावसार करीत आहे.