पाच लाखासाठी विवाहितेचा छळ : पतीसह सासू, सासर्‍यांविरूध्द गुन्हा

0

भुसावळ : कपड्यांच्या व्यापारासाठी पाच लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ करीत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिणे काढून घेण्यात आले. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासू, सासर्‍यांविरूध्द भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ येथील सिंधी कॉलनीतील नानक नगरातील माहेर असलेल्या पूजा मनिष सुखीजा यांना 18 फेब्रुवारी 2018 ते 2 जानेवारी 2020 पूर्वी दोन महिने अगोदर पती मनीष रामचंद सुखीजा, सासरे रामचंद किसनचंद सुखीजा, सासू सुनीता सुखीजा (रा. कन्हैया नगर, ठाणे पूर्व) यांनी विवाहिीतेस मारहाण करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिणे काढून घेत दमदाटी केली, म्हणून विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालार सुनील जोशी पुढील तपास करीत आहे.