जळगाव : नवीन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये न आणल्याने जळगावातील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
सिंधी कॉलनीतील माहेर आलेल्या रीया शंकरलाल राजपाल (20) यांचा विवाह गल्लीतील राहुल अशोककुमार तलरेजा यांच्याशी रितीरिवाजानुसार विवाह झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती राहुल याने विवाहितेला माहेरहून पाच लाख रुपये आणावे यासाठी तगादा लावला. माहेरची परीस्थिती हालाखीची असल्याने विवाहिता पैश्यांची पूर्तता करू शकली नाही याचा राग मनात ठेवून पती, सासु, दोन नणंद यांनी पैशांसाठी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून माहेरी आई-वडीलांकडे निघून गेल्या. गुरूवारी विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने पती राहुल अशोककुमार तलरेजा, सासू आशा अशोक तलरेजा (दोन्ही रा. सिंधी कॉलनी), नणंद पूजा हरीष ननकानी (पुणे) आणि नणंद वैशाली प्रदीप चावला (चाळीसगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार प्रदीप पाटील करीत आहे.