पाच वर्षांची हुशार चिमुरडी झाली कॅनडाची पंतप्रधान

0

टोरँटो । मी पंतप्रधान झालो तर? असा प्रश्‍न शाळेच्या परीक्षांमध्ये हमखास विचारला गेलेला असतो. मग आपणही लहानपणीच्या विकासाची व्याख्या त्यावेळी लिहिलेली असते. मुलांना खेळायला द्यावं, झोपायला द्यावं असं काहीही. पण, त्याच वयात कोणी थेट आपल्याला पंतप्रधानांची खुर्ची ऑफर केली असती तर? हो असे प्रत्यक्षात घडले आहे. कॅनडा देशात पाच वर्षांची हुशार चिमुरडी थेट पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये दिसत आहे. ‘नायक’ चित्रपट आपल्या सर्वांना आवडत असावा. कारण आपण नेहमीच शिव्या घालत असणार्‍या राजकारण्यांनी म्हणजेच सिनेमात अमरीश पुरी हे अनिल कपूरला एका दिवसांचा मुख्यमंत्री बनवतात. त्याचप्रमाणे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी एका पाच वर्षाच्या चिमुरडीला एका दिवसासाठी पंतप्रधानपदी विराजमान केले. त्यामुळे ही चमुरडी जगभरात लोकप्रिय झाली आहे.कॅनडामध्ये सीबीसी किड्स स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात बेला थॉम्पसन ही पाच वर्षाची चिमुरडीही स्पर्धक म्हणून आली होती.

इतर स्पर्धकांप्रमाणे ती प्रामाणिकपणे स्पर्धा खेळली आणि जिंकलीसुद्धा. बघता बघता तिने सर्व टप्पे पार करीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांक मिळवल्याने बेलाला पंतप्रधान कार्यालयात बसण्याची संधी मिळाली. यादरम्यान बेलासोबत पंतप्रधान जस्टिन ट्रुडोही खेळताना दिसून आले.

बेलासाठी उशांचा किल्ला
पंतप्रधानांनी बेलासाठी कार्यालयातील उशांचा एक किल्लाही बनवला. पंतप्रधानांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, पाच वर्षाच्या चिमुरडीला एका दिवसासाठी पंतप्रधान बनवले गेले तर काय होईल? उशांचा किल्लाच बनणार ना. ट्विटसोबत फोटोही शेअर केले आहेत.

हटके वागण्यासाठी प्रसिद्ध
याआधीही पंतप्रधान जस्टिन ट्रुडो वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. ट्रुडो यांनी आपल्या 3 वर्षाच्या मुलाला पंतप्रधान कार्यालयात आणले होते. मुलासोबत खेळतानाचा एक फोटोही त्यांनी ट्विट केला होता. त्यानंतर पंतप्रधानांच्या हटके वागण्याची अनेकांनी प्रशंसा केली होती. बेला थॉम्पसन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहेत. सर्वजण या चिमुरडीचे कौतुक करीत आहेत.