पाच वर्षांपासून फरार संशयित जेरबंद

0

जळगाव। रावेर पोलिस ठाण्यातील खुनाच्या तसेच खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यातील संशयित गेल्या पाच वर्षांपासून फरार होता. त्यास अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे. संशयिताला पथकाने अटक करून त्याला पुढील कारवाईसाठी रावेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रावेर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या भाग 5 गुरन 224/2012 भादवी कलम 302, 307,143, 147 तसेच भाग 5 गुरन 222/2012 भादवी कलम 307, 324,341,295 या कलमातील गुन्यात असलेला संशयित शेख सादीक शेख मेहबुब वय-32 रा. रावेर हा घटना घडल्यापासून फरार झाला होता.

पोलिसांचा शोध सुरू असतांना देखील त्याचा थांगपत्ता कुणाला मिळत नव्हता. अखेर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना संशयिताविरूध्द गुप्त माहिती मिळाली. त्या आधारावर त्यांनी पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार मनोहर देशमुख, मुरलीधर अमोदकर, दिलीप येवले, अशोक चौधरी, महेंद्र पाटील, रमेश चौधरी, योगेश पाटील, सुशिल पाटील, महेश पाटील आदींचे पथक तपासासाठी पाठविले.

संशित शेख सादीक याचा पथकाने रावेर शहरात शोध घेतला असता तो शहरातील दर्ग्याजवळ असल्याची माहिती पथकाला मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जावून सापळा रचला आणि पाच वर्षापासून फरार असलेला संशयित शेख सादीक शेख मेहबुब याला ताब्यात घेतले.