पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

0

चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) गावच्या हद्दीत जंबुकरवस्तीजवळ बजाज ऑटो कंपनीच्या मोकळया जागेत दोन महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत पडलेल्या इस्टिम मोटार कारमध्ये एका पाच वर्षाच्या लहान मुलाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती ठाणे अंमलदार अशोक साळुंके यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.2) दुपारी 12 ते सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान घडली.

करण अखिलेश पांडे ( वय 5, रा.जंबुकर वस्ती, खराबवाडी ) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अखिलेश सियाराम पांडे ( वय 35, रा. जंबुकर वस्ती,) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पवार पुढील तपास करीत आहेत.