3 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार
धरणगाव / जळगांव : पाच वर्षाच्या काळात मंत्रिपदाची गरिमा राखून कोट्यवधींची विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जाती – पातीचे राजकारण कधीही केले नाही. विरोधकांच्या टीकांना विकास विकासकामांच्या माध्यमातून उत्तर दिली आहेत . पक्षात शेकडो कार्यकर्त्यांना विविध पदावर बसून न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 5 वर्षातील काळात केलेल्या विकासकामांना व प्रामाणिक सेवेला भक्कम साथ द्या असे भावनिक आवाहन करून सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिक व जनतेच्या आशीर्वादाने लाखाचे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कोणाचे नाव न घेता विरोधकांवर चौफेर टिका करून 3 ऑक्टोबर ला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले.
ते धरणगाव येथे सुकमल लॉन येथे झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते. यावेळी जगतराव नाना पाटील जि.प.चे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील , बाळू सपकाळे , भदाने गुरुजी , सचिन पवार , तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, पी.एम.पाटील, गोपाल चौधरी यांनीही आपली मनोगते व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे पदाधिकारी गजानन पाटील, गोपाल चौधरी ,संजय पाटील ,जानकीराम पाटील, मंगल अण्णा पाटील,भदाने गुरुजी, प्रेमराज पाटील, गोपाल जिभाऊ , राजेंद्र चव्हाण, भागवत मोरे , अनिल भोळे, मनोज पांडे, नाना भालेराव ,सुधाकर पाटील , दिपक सोनवणे, राजू भैय्या पाटील , पप्पू भावे, सुरेश चौधरी, सर्व नगरसेवक, मनोज चौधरी, मुकुंद नन्नवरे , अंजलीताई विसावे, उषाताई वाघ, शोभाताई ठाकर, जना अक्का पाटील, अश्विनीताई भाटिया, कल्पना कापडणे, रामचंद्र पाटील प्रेमलाल पाटील आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला विरोधकांच्या उरात धडकी भरावी अशी हजारोंच्या संख्येने शाखा प्रमुख,बूथ प्रमुख, सरपंच, ग्रा पं सदस्य, विका सोसायटी चेअरमन व संचालक, शिवसेना व युवसेना कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थिती होते. प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील तर सूत्रसंचालन माजी जि.प. सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले तर आभार शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी मानले.
शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात तालुक्यातील बोरगावचे सरपंच नामदेव पाटील, ग्रा.प. सदस्य जितेंद्र धनगर, गोरख पाटील,शेरीचे मा.सरपंच प्रभाकर बोरसे, गुणवंत बोरसे,धरणगावच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शिलाताई चव्हाण,बांभोरीचे माधवराव पाटील,लिलाधार पाटील, कंडारी बु चे रहीम पटेल,शाहरुख पटेल,राहुल भिल, मनोज महाजन,तौसीफ शाह ,चोरगाव ,दोनगवा बु, येथिल रावसाहेब वानखेडे,ईश्वर बनसोडे,विलास मोरे,अहिरे खु सोसायटी मा. चेअरमन रावसाहेब चव्हाण,भागवत चव्हाण,धरणगाव येथिल न्यू जय हिंद मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, यांच्यासह चोरगाव, अनोरे व धानोरा येथील राष्ट्रवादी व इतर पक्षाच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला .