पाच वर्षात गडकरींच्या संपत्तीत १४० टक्क्यांनी वाढ

0

मुंबई- केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संपत्तीत गेल्या ५ वर्षांच्या काळात १४० टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गडकरी यांनी नामांकन दाखल करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पत्नीच्या उत्पन्नात देखील १० पट (127 टक्के) वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये नितीन गडकरी यांचे वार्षिक उत्पन्न ६.४ लाख रुपये होते तर, पाच वर्षांपूर्वी (२०१३-१४) त्यांची वार्षिक उत्पन्न होते २.७ लाख. गडकरी यांच्या उत्पन्नात सर्वाधिक वाढ २०१४-१५ मध्ये झाली. या वर्षादरम्यान त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन ते ६ लाख रुपयांवर गेले. त्यांच्या पत्नीचे उत्पन्न २०१३-१४ मध्ये त्यांचे उत्पन्न ४.६ लाख रुपये इतके होते. त्यात वाढ होऊन सन २०१७-१८मध्ये ते ४० लाख रुपये इतके झाले. यावेळी पहिल्यांदाच उमेदवारांना गेल्या ५ वर्षांमधील आयकर परताव्यात घोषित उत्पन्नाचा तपशील द्यावा लागणार आहे.

तीन गुन्हे दखल
जुन्या आणि नव्या प्रतिज्ञापत्रांची तुलना केल्यास, गडकरी यांची बँकेतील जमा आणि गुंतवणुकीत घट झाली आहे. बँकेत त्यांचे ९ लाख रुपये जमा आहेत. विशेष म्हणजे सन २०१४च्या तुलनेत यात ५७ टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गडकरी यांनी निवडणुकीसाठी एक वेगळे खाते उघडले आहे. यात १ लाख रुपये आहेत. शेअर मार्केटमधील त्यांच्या गुंतवणुकीत ७८ टक्क्यांची घट होऊन की ३.५५ लाख इतकी झाली आहे. पूर्ती ग्रुप ऑफ कंपनीजसह समभांगांच्या विक्रीमुळे हे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गडकरींकडे पूर्ती पॉवर अॅण्ड शुगरचे ३१० समभाग आहेत. त्यांच्या प्रति समभागाची किंमत १ रुपया आहे. यांच्याकडे १० हजार रुपये किंमतीची अॅम्बॅसिडर कार आहे. तर, २० लाख रुपये किंमतीची एक होंडा देखील आहे. त्यांनी १४.८ लाख रुपये व्यावसायात गुंतवले आहेत. त्यांच्यावर असलेल्या कर्जाची रक्कम सन २०१४ मध्ये १.३ कोटींवरून वाढून ते १.५७ कोटी रुपये इतके झाले आहे. गडकरींविरोधात तीन गुन्ह्यांची नोंद आहे.