298 भारतीयांना पाकचे नागरिकत्व

0

इस्लामाबाद : पाकिस्तानने मागील पाच वर्षात 298 स्थलांतरित भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व दिले असल्याची माहिती पाक सरकारने दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती देण्यात आली. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असतानाही मोठ्याप्रमाणात स्थलांतर झाल्याचे या माहीतीमुळे उघड झाले आहे.

वर्ष 2012 साली 48 भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले होते. 2013 साली 75 आणि 2014 साली 76 नागरिकांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले होते. वर्ष 2015 साली अवघ्या 15 भारतीयांना नागरिकत्व देण्यात आले होते. त्यानंतर 2016 साली 69 जणांना नागरिकत्व देण्यात आले. यावर्षी 14 एप्रिलपर्यंत 15 स्थलांतरित भारतीयांना पाकिस्तानने नागरिकत्व दिले. तरीदेखील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमारसारख्या देशांतील अनेक नागरिकांना नागरिकत्व देण्यात आल्याचे पाक गृहमंत्रालयाने म्हटले आहे.