पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; सीसीटीव्हीमुळे नराधमाची पटली ओळख

0

तालुका पोलीसात गुन्हा दाखल
नराधमाने मोबाईल चोरून पीडितेवर अत्याचार केल्याची दिली कबुली
जळगाव- कोल्हे हिल्स परिसरात वास्तव्यास आलेल्या मजूर कुटुंब कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा स्कूलजवळ माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या घराचे बांधकाम असलेल्या ठिकाणी झोपडीत राहते. पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास पीडितेच्या वडील आणि काकांना तिच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्हीमुळे नराधमाची पटली ओळख
शहरातील समता नगरात राहणार्‍या 9 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह गोणपाटमध्ये बांधलेल्यावस्थेत धामणगाववाडा भागातील टेकडीवर 13 जून 2018 रोजी आढळून आल्याने परीसरात एकच खळबड उडाली आहे. समता नगर टेकडी भागात सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास कचरा फेकायला गेलेल्या एका महिलेला पोत्यात मृतदेह आढळल्याने हा प्रकार उघडकीस आले होते. याबाबत आरोपी आदेशबाबाला अटक करण्यात आली होती.

पीडितेच्या पालकांचा घेतला जबाब
पीडित चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी राणासिंग सिकलगर याने मुलीला घटनास्थळी सोडून देवून तिथून पळ काढला होता. सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांना बोलावले. तसेच मुलीच्या आई वडिलांचा जबाबही नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर एलसीबीच्या टीमने परीसर पिंजून काढला. घटनास्थळावर पिडीतेचे कपडेही काटेरी झुडूपात आढळून आले.