पाझर तलावांच्या तत्काळ दुरुस्तीसाठी आमदार जावळेंची विधानसभेत मागणी

0

दोन दिवसात कार्यवाहीचे जलसंधारण मंत्र्यांचे आश्वासन

फैजपूर (नीलेश पाटील):- यावल-रावेर तालुक्यातील नागादेवी व भिलानी, ता.यावल, तसेच जानोरी व सहस्त्रलिंग, ता.रावेर या पाझर तलावांची दुरवस्था झाल्याने त्यांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेची असून तसे झाल्यास या परीसरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळून शेती सिंचनाखाली याबाबत आमदार हरीभाऊ जावळेंनी विधानसभेत लक्ष वेधल्याने जलसंधारण मंत्र्यांनी दोन दिवसात कार्यवाहीचे आश्वासन दिले.

आमदारांनी वेधले लक्ष
आमदार जावळे म्हणाले की, पाझर तलावांची दुरुस्ती केल्यास एका पाझर तलावामध्ये कमीत-कमी 506 दशलक्ष घन फुट मीटर पाणी साठवता येईल व त्याचा शंभर टक्के फायदा उन्हाळ्यामध्ये शेतकर्‍यांना होईल. सदर पाझर तलाव दुरुस्ती करणे बाबतचा प्रस्ताव गेल्या काही वर्षापासून शासनाकडे प्रलंबित असून अद्याप यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या पाझर तलावांमध्ये यावल तालुक्यातील नागादेवी पाझर तलाव दुरुस्ती करण्यासाठी अंदाजीत 95.00 लक्ष रुपयांची गरज असून, या तलावाची दुरुस्ती तत्काळ होणे करिता लोक 6 ते 7 गावांतील लोक रस्त्यावर आलेले आहे. आमदार जावळे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जलसंधारण मंत्री, जलसंपदा मंत्री व जळगाव चे पालकमंत्री यांच्याकडे पाझर तलावाच्या दुरुस्तीसंदर्भात पत्रही दिले. जलसंधारण मंत्र्यांनी दोन दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.