जामनेर। तालुक्यातील शेंगोळा गावातील परिसरातील तलावात शनिवारी रात्री अज्ञात माथेफिरूने विषारी द्रव्य टाकल्याने तलावातील सुमारे ४० क्विंटल मासे मृत पडले आहे.पूर्ववैमन्यस्यातून हा प्रकार घडला असावा, असा कयास पोलीसांनी लावला असून याप्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शेंगोळा परिसरात असलेल्या तलावाचे ग्रामपंचायत लिलाव करीत असून मच्छी व्यवसाय करणाऱ्यांना हे तलाव दिले जातात. यावर्षी चार व्यवसायीकांनी एकत्र येऊन त्यांनी या तलावात मच्छी बीज सोडले होते . शनिवारी रात्री या तलावात विषारीद्र्व्य टाकल्याने या तलावाचे संपूर्ण पाणी दुषीत झाले असून गुरांच्या व अन्य प्राण्यांनी हे पाणी पिल्यास ते पण दगाऊ शकतात. म्हणून या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी व मच्छी व्यवसायिकांना शासन स्तरावरून मदत मिळावी, अशी मागणी शेंगोळाचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते दिलीप रदाळ यांनी केली आहे.