जळगाव : तालुक्यातील विटनेर येथे शेतातील पाझर तलावात योगेश ज्ञानेश्वर वराडे वय 19 व ज्ञानेश्वर दगडू ढमाले वय 28 या दोन्ही शेतकरी तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत योगेश हा सुरुवातीला हातपाय धुण्यासाठी गेला होता तो पाय घसरुन पाझर तलावात पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेला ज्ञानेश्वर हा सुद्धा बुडाला व दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
विटनेर येथील पाझर तलावांमध्ये आजूबाजूला राहणारे शेतकरी यांनी शेतामध्ये काम केल्यानंतर फवारणी झाल्यावर हात पाय धुण्यासाठी गेला. यादरम्यान शेतकरी योगेश हा पाण्यात पडला तो तलावात बुडत असताना त्याच वाचवण्या कामी शेतकरी ज्ञानेश्वर हा गेला असता सदर दोन्ही शेतकरी हे तलावात बुडून त्यांचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शिवदास चौधरी, सचिन देशमुख व पोलीस पाटील विटनेर साहेबराव धुमाळ यांनी गावकऱ्यांच्या मदतीने बुडालेले मृतदेह पाण्या बाहेर काढले. पुढील कारवाई कामी सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे.