पाझर तलावामुळे साडेतीनशे एकर जमीनीला सिंचनाचा होणार लाभ – एकनाथ खडसे

0

काहुरखेडा पाझर तलावातील पाण्याचे झाले जलपूजन

वरणगाव- हतनुर धरणातून लाखो लिटर वाहून जाणारे पाणी दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील नवीन प्रकल्पासाठी ओझरखेडा धरणात व काहूरखेड्याच्या पाझर तलावात सोडले जात आहे.यामूळे या परिसराला जीवन संजीवनी मिळाली असून पाझर तलावामूळे साडे तिनशे एकर जमिन सिंचनाखाली येणार असल्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगीतले.
तालुक्यातील काहुरखेडा येथील पाझर तलावात साठवण्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन प्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे बोलत होते .यावेळी खासदार रक्षा खडसे , आमदार संजय सावकारे , माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी , सभापती निवृत्ती पाटील , माजी उपसभापती गोलू पाटील , सरपंच जयश्री वराडे , उपसरपंच अरूण वराडे , दिलीप वराडे , पं .स . सदस्य विकास पाटील , सरपंच वैशाली टाकोळे , उपसरपंच राजकुमार चौधरी , आयव्हीआर कंपनीचे निलेश भोसले , पाटबंधारे अभियंता चिनावलकर आदी मान्यवरांचा काहुरखेडा व मानपूर गृप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला .

शेतकर्‍यांना होणार फायदा
काहुरखेडा पाझर तलावाची क्षमता ही तीन पॉईंट पंचवीस लक्ष घनमीटर असून वरणगाव तळवेल परिसर उपसा सिंचन योजनेतून सदर तलावात दिवस- रात्र डिलिव्हरी चैनल मधून पाणी पुरवठा करून 98% भरण्यात आला आहे.यामूळेे तलावाच्या खालील बाजूच्या जवळपास चाळीस ते पन्नास विहिरींना पाणी आले असून पंचक्रोशीतील सर्व शेतकर्‍यांना याचा फायदा होणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगीतले.

योजनेचे काम झाले पुर्ण
वरणगाव तळवेल उपसा सिंचन सन 1999 मध्ये मान्यता देण्यात आली होती .निधीच्या उपलब्धतेनुसार या योजनेचे काम प्रगतीपथावर होऊन आज आयव्हीआर कंपनीच्या माध्यमातून सर्व काम पूर्ण झाले आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य जगन वराडे , संतोष तायडे , मुकेश तायडे , युवराज वामणे, मधुकर वराडे , नंदू वराडे , संतोष मोरे, गोपाळ वराडे , जितेंद्र वराडे , ग्रामसेवक के. ए .भंगाळे , आंनद सुरवाडे , संतोष मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितीत होते. सूत्रसंचालन मुकेश तायडे यांनी केले.