चाळीसगाव – तालुक्यातील पाटणा गाव येथे दुकानासमोरील खाटे वरून उठविल्याचा राग येऊन किराणा दुकान चालकाच्या डोक्यात आडजात लाकूड मारून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी दारू पिलेल्या गावातीलच एकावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून हि घटना 6 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 2 ते 6:30 वाजेच्या दरम्यान पाटणा गावातील फॉरेस्ट कॉर्टर जवळ घडली असून गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील पाटणा गाव येथील अशोक बबन सोनवणे हा दारूच्या नशेत मंगळवार 6 डिसेंबर रोजी पाटणा गाव येथील अशोक नामदेव धात्रक (47) यांच्या फॉरेस्ट कॉर्टर जवळील भगवती किराणा समोर दुपारी 2 वाजेपासून त्यांना शिवीगाळ करून दारूच्या नशेत अंगावर दगड घेऊन धावून गेला होता. तसेच दारूच्या नशेत दिवसभर दुकानाजवळ फिरत होता. किराणा दुकानासमोरील खाटी वरून त्याला उठण्यास सांगितल्याचा राग येऊन सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास त्याने त्यांच्या हातातील आडजात लाकूड अशोक धात्रक यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूस मारून गंभीर दुखापत केली या प्रकरणी आरोपी अशोक बबन सोनवणे याचे विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला भाग 5 गु. र. न. 125/2016 भादवि कलम 324, 352, 504, 510 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक तुकाराम भालेराव करीत आहे.