पाटणादेवी पुलाबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली तत्काळ दखल

चाळीसगाव : तालुक्यातील अंतरराष्ट्रिय पर्यटन स्थळ असलेल्या पाटणादेवी मंदिराला भेट दिली. हजारो लोक दर्शनासाठी आले होते. पूल नसल्याने जीव धोक्यात घालून भाविक दर्शनासाठी जात असल्याचं चित्र आहे.   या ठिकाणाहून माननीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. परिस्थितीची माहिती, पर्यटन स्थळाचा महत्त्व आणि होणाऱ्या अडचणी याविषयी माहिती दिली. ही अडचण सोडवायची असेल तर किमान तीस फूट उंचीचा पूल उभारण्यात यावा अशी विनंती केली.  माननीय मंत्री महोदय यांनी तत्काळ स्विय सहायक यांच्यामार्फत पूल आणि होणाऱ्या अडचनी विषयी फोटो, व्हिडिओ आणि मगणीपत्र मागवून घेतले.  हा विषय तात्काळ मार्गी लावण्याचं आश्वासन मंत्री महोदय यांनी दिले.

मा. मंत्री महोदय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना चाळीसगाव वासियांकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

आपला
प्रफुल्ल साळुंखे
चाळीसगाव विकास मंच