पटना पायरेट्स विजयाची लय राखणार

0

हैदराबाद । प्रो लीग कबड्डीमध्ये गुरुवारी फक्त एकच सामना होणार आहे. ब गटातील या सामन्यात गतविजेत्या पाटणा पयारेट्ससमोर यजमान तेलुगु टायटन्स संघाचे आव्हान असणार आहे. पाचव्या सत्रात पाटणा पायरेट्सने आपला दबदबा राखत विजयी आगेकूच कायम राखली आहे. दुसरीकडे यजमान संघाची मात्र निराशाजनक कामगीरी होत आहे. त्यामुळे पाटणा पायरेट्सला सत्रातील पहिल्या सामन्यातील विजयाची पुनरावृत्ती साधण्याची संधी मिळाली आहे.

मागील सत्रात उपांत्य फेरीत मजल मारणार्‍या तेलुगु टायटन्सला यावेळी अजूनही सूर सापडलेला नाही. त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये त्यांना रणनीतीत बदल करावा लागणार आहे. या संघाची संपूर्ण मदार कर्णधार राहुल चौधरीवर अवलंबून आहे. पण राहुलच्या खेळालाही मर्यादा आहेत हे मागील सामन्यांवरुन स्पष्ट झाले. त्यामुळे संघातील इतर खेळाडूंनाही राहुलच्या खांद्याला खांदा लावून मैदानात खेळ करावा लागणार आहे.