पाटणूसच्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीद्वारा मिळतेय अारओचे शुद्ध पाणी 

0

पाली-बेणसे | रायगड  जिल्ह्यातील अनेक गावे शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. पाणी हे जीवन आहे. अशातच शुध्द पाणी मिळविण्यासाठी नागरीकांचा पराकोटीचा संघर्ष सुरु असल्याचे सर्वत्रच पहावयांस मिळते. अशातच पाटणूस ग्रामपंचायतीने मात्र आपल्या ग्रामस्थांसाठी आरओच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. येथील ग्रामस्त, विद्यार्थी, व पर्यटकांच्या आरोग्याची काळजी ग्रामपंचायतीने घेतली आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आदर्शवत ठरावे असे नाविण्यपुर्ण काम पाटणूस ग्रामपंचायतींने केले आहे. ग्रामपंचायतीने गावकर्‍यांना पाणी घेण्यासाठी वीस लिटरचे पाचशे जार सुध्दा मोफत दिले आहेत. पाटणूस ग्रामपंचायती समोरील जागेत पाच लाख रुपय खर्चून मोठे अारओ प्लांट पाणी शुद्धिकरण यंत्र बसविले आहे. त्याला लावलेल्या मशिनमध्ये रुपयाचे, दोन रुपयांचे व पाच रुपयांचे नाणे टाकल्यास अनुक्रम तीन, पाच अाणि वीस लिटर पाणी बाहेर येते. या पाण्याचा लाभ गावकर्यांसह विदयार्थी व पर्यटकांना होत आहे. त्यामुळे नागरीकांच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न अाता मिटला असल्याचे उपसरपंच अांदेश दळवी यांनी सांगितले.  पाटणुस सरपंच विजय म्हामूणकर यांनी सांगितले की पाणी नेण्याचा नागरीकांचा त्रास कमी व्हावा व त्यांचा वेळ वाचावा यासाठी लवकरच ग्रामपंचायतीमार्फत घरोघरी पाणी पुरविण्यात येईल. या संदर्भातील ठराव ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आला आहे. वीस लिटरच्या पाच रुपयांच्या जारवर फक्त दहा रुपये ट्रान्सपोर्ट खर्च घेण्यात येईल. असे म्हामुणकर यांनी सांगितले. रोज किमान शंभर ते सव्वाशे नागरीक येथून पाणी भरुन नेतात. त्यामुळे या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

 लवकरच घरोघरी पोहचविणार पाणीपाटणुस सरपंच विजय म्हामूणकर यांनी सांगितले की पाणी नेण्याचा नागरीकांचा त्रास कमी व्हावा व त्यांचा वेळ वाचावा यासाठी लवकरच ग्रामपंचायतीमार्फत घरोघरी पाणी पुरविण्यात येईल. या संदर्भातील ठराव ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आला आहे. वीस लिटरच्या पाच रुपयांच्या जारवर फक्त दहा रुपये ट्रान्सपोर्ट खर्च घेण्यात येईल.

कोटग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होतच आहे. परंतू ग्रामस्थांचे अायुष्य निरोगी रहावे यासाठी त्यांना अारओचे शुद्ध पाणी कसे देता येईल या विचारात अाम्ही होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने हा अारओ प्लांट उभारला. अगदी नाममात्र शुल्कात नागरीकांना शुद्ध अारओचे पाणी मिळत अाहे. त्यामूळे नागरीक, विदयार्थी व पर्यटक देखिल खुश असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.

विजय म्हामूणकर, सरपंच, पाटणूस ग्रामपंचायत