भुसावळ : प्रवासी झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी 18 हजारांचा मोबाई लांबवला. प्रयागराज-एलटीटी पाटलीपूत्र एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली. भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रवासी झोपताच लांबवला मोबाईल
प्रयागराज एलटीटी पाटलीपूत्र एक्स्प्रेसच्या बी-2 या डब्यातील सीट 55 वरून प्रवास सुभाष मिश्रा (रा.मुंबई) हे प्रवास करीत असतांना त्यांच्या झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचा 18 हजार रुपये किंमतीचा मोबाईल कटनी स्थानकावर गाडी उभी असताना लांबवला. मिश्रा यांना जाग आल्यावर ही बाब लक्षात आली. त्यांनी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून मोबाईल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा कटनी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.