पाटाच्या पाण्यात पडल्याने तरुणीचा मृत्यू

0

भुसावळ । पाडळसे-बामणोद रस्त्यावरील पाटाच्या पाण्यात 22 वर्षीय अज्ञात तरुणीचा बुधवारी सकाळी 10 वाजता मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. सकाळी शेतात कामासाठी जात असलेल्या मजुरांना पाटाच्या पाण्यात तरुणीचा मृतदेह असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस पाटील सुरेश वामन खैरनार यांना माहिती दिली. फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक रामलाल साठे व आधार निकुंभे, विजय पाचपोळे यांनी धाव घेत पंचनामा केला. ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्‍वर तायडे, सामाजिक कार्यकर्ते नारायण कोळी, पांडुरंग कोळी, रज्जाक सैय्यद, निसार सैय्यद, प्रशांत तायडे, प्रवीण तायडे, प्रशांत सोनवणे आदींनी मृतदेह बाहेर काढण्याकामी सहकार्य केले. मयत तरुणी वेडसर असून पाटाच्या पाण्यात पडल्यानेच तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.