गांधीनगर-गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व आता हार्दिक पटेल यांच्या हातात नसणार आहे. पाटीदार आंदोलन समितीने अल्पेश कथिरिया यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व असणार आहे. हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे, त्यामुळे नेतृत्व कथिरिया यांच्याकडे देण्यात येणार आहे.
पाटीदार आंदोलन समितीचे नियम असे आहे, की समितीत राहून कोणीही राजकारण करू शकत नाही. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्याकडून हे नेतृत्व अल्पेश कथिरिया यांच्याकडे जाणार आहे.
अल्पेश कथिरिया मागील तीन महिने तुरुंगात होते. जामिनावर त्यांची सुटका झालेली आहे.