पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल लवकरच विवाह बंधनात अडकणार

0

नवी दिल्ली : पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. हार्दिक पटेलचे लग्न येत्या २७ तारखेला किंजलशी होणार आहे. हे लग्न सुरेंद्र नगर येथील दिगसर दाणावाड गावात पारंपारिक पद्धतीने होणार आहे. किंजल ही मूळ विरमगाव येथील रहिवासी आहे. सध्या ती सुरत येथे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत असून किंजल लॉ ची विद्यार्थीनी आहे. हार्दिकने लग्नाबद्दल अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य केलं नसले तरीही त्याच्या वडिलांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राचा वृत्तानुसार हार्दिक पटेलचे वडिल भारतभाई पटेल यांनी सांगितले की, येत्या २७ जानेवारी रोजी हार्दिक आणि किंजलचे लग्न करण्यात येणार आहे. वधु आणि वर पक्षाकडून जवळ जवळ ५० लोक उपस्थित राहातील. हे लग्न पूर्ण पारंपारिक पद्धतीने केले जाणार आहे.