पाटीबेडकी येथे जोरदार वादळासह पावसाची हजेरी

0

नवापूर। तालुक्यातील पाटीबेडकी येथे सायंकाळी जोरदार वादळी पावसाने थैमान घालुन अनेक लोकांचा घरांचे नुकसान केले. गोल चक्की प्रमाणे वादळ फिरले व बघता बघता घरांचे छप्परे उडवून नेली. यात निमा वसू गावीत रा. पाटीबेडकी यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी नवापूर शहरात पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र पाऊस पुढे सरकुन ग्रामीण भागात तो वादळी वारासह बरसला.

गांडुळ खत असलेल्या पाण्याच्या टाकीवर वीज खांब पडून नुकसान
पाटीबेडकी या आदिवासी शेतकरी मजुर गाव पाड्यावर वादळी पावसामुळे घराची पत्रे उडाली. पत्रेे जी उडाली ती शंभर फूट अंतरावर जाऊन पडली. तसेच वीजचा पोल हा पडून तो गांढुळ खत असलेल्या पाण्याच्या टाकीवर जाऊन पडुन ती फुटली. तसेच गावातील घरे व सामान वादळ वार्‍यांवर उडत होते. कोणाची कपाटे तर फाईली कागद संसारं उपयोगी सामग्री वादळी पावसाने वाहुन नेली आहेत. तसेच शेतात असलेल्या कांदा पाण्यात गेला असून 14 गोण्यात पाणी शिरून ते खराब झाले आहेत़. काही क्षणातच वादळ वार्‍याने सायंकाळी येऊन नुकसान करून गेला. नवापूर शहरात पाऊस हुलकावणी देत आहे. फारच उकाडा वाढला असून लोक घामाघूम होत आहे. पावसाचे वातावरण सायंकाळी होते. मात्र तो येतच नाही. क्षणभर पावसाचे वातावरण होते आणि तास भर वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मान्सून पुर्व कामे अद्याप झालेली नाही. वीजतारांवरील झाडांच्या फांद्या तोडलेल्या नाही. तसेच नाले सफाई झालेली नाही. एकुणच फक्त प्रचंड उकाडा आणि पावसाचे वातावरण अशी परिस्थिती आहे. तर ग्रामीण भागातील गाव पाड्यावर कुठे ना कुठे तो बरसत आहे. दरम्यान पाटीबेडकी गावात जाऊन तलाठी सर्कल यांनी पंचनामा केला आहे.